Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीच्या अपहरणात मदत करणारा मित्र गजाआड

अहमदनगर: अल्पवयीन मुलीच्या अपहरणात मदत करणारा मित्र गजाआड

Breaking News | Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात  आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिस पथकाने अटक.

Arrested friend who helped kidnap a minor girl

राहुरी : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात  आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिस पथकाने अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा ९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी याबाबत सखोल तपास केला. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या सोबत विवाह करता यावा, या उद्देशाने आरोपी साजन सुदाम माळी (रा. राहुरी खुर्द) याने पळवून नेले व त्यास या कृत्यामध्ये त्याचा मित्र विकास नामदेव बर्डे याने मदत केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आरोपी विकास यास ६ फेब्रुवारी २०२४ रोजी राहुरी पोलिसांनी अटक करून विचारपूस केली. त्याने दिलेल्या माहितीवरून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पीडितेस तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

मुख्य आरोपी साजन सुदाम माळी यास ११ फेब्रुवारी २०२४ रोजी राहुरी पोलिसांनी अटक केली. यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार बाळासाहेब शेळके, विकास वैराळ, पोलीस नाईक जयदीप बडे, इंफ्तेखार सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली. बर्डे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला ४ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोडे हे करत आहेत.

Web Title: Arrested friend who helped kidnap a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here