Home अहमदनगर विवाहितेवर अत्याचार करून अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत

विवाहितेवर अत्याचार करून अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत

Ahmednagar Crime: अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची घटना (Arrested).

Arrested for viral video of abuse on a married woman

अहमदनगर:  विवाहितेवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली. व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी किशोर सीताराम तळेकर (रा. वाळुंज, ता. नगर) याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

किशोर तळेकर याने एका विवाहितेवर 22 जुलै रोजी अत्याचार केला होता. या घटनेचे त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. या रेकॉर्डिंगच्या आधारे ही बाब कोणास सांगितल्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. किशोर याने काही दिवसांपूर्वी हे रेकॉर्डिंग काही सोशल मीडियावर व्हायरल केले. या विवाहितेच्या पतीच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी ही बाब विवाहितेच्या पतीला सांगितली.

अखेर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी किशोर सीताराम तळेकर (रा. वाळुंज, ता. नगर) याच्याविरूध्द माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने आरोपी किशोर याला तात्काळ अटक केली.माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिला जात आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 11 पर्यंत पोलीस सुनाविण्यात आली आहे.

Web Title: Arrested for viral video of abuse on a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here