Breaking News | Nagpur Crime: शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीच्या विनयभंगाची घटना.
नागपूर : शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीच्या विनयभंगाची घटना पुढे आली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी शेजारी भाडेकरूला अटक केली. देवराव केशवराव गाणार (३७, रा. सोमवारी क्वॉर्टर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी जेव्हा आरोपीच्या घरातील फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी घेण्याकरिता आली तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. सक्करदरा हद्दीतील सोमवारी क्वॉर्टर येथे भंडारा जिल्ह्यातील २३ वर्षीय पीडित तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसोबत किरायाने राहते.
त्या दोघी नागपूर शहरात शिक्षण घेण्यासाठी काही वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या खोलीच्या खाली आरोपी देवराव गाणार राहतो. तो खासगी कामे करतो. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. त्याच्या खोलीच्या खाली घरमालक राहतात. दरम्यान, अनेक वर्षांपासून राहत असल्याने आरोपीची पीडिता आणि तिच्या बहिणीशी ओळख आहे. यातून त्यांचे एकमेकांच्या घरी जाणेयेणे आहे. दरम्यान मुलींच्या घरी फ्रिज नसल्याने अनेकदा ते घरचा भाजीपाला आरोपीच्या घरातील फ्रिजमध्ये ठेवत होत्या. १२ नोव्हेंबरला देवरावची पत्नी तिच्या माहेरी गेली होती.
आरोपी घरी एकटाच होता. नेहमीप्रमाणे पीडितेला फ्रिजचे काम पडल्याने ती देवरावच्या घरी आली. त्याचवेळी त्याने संधी साधून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. तिने विरोध केल्यानंतर देवरावने यासंदर्भात कुणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
देवरावच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर पीडितेने घटनेची माहिती बहिणीला दिली. त्यानंतर त्यांनी सक्करदरा ठाणे गाठत तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी देवराव गाणारविरुद्ध कलम कलम ७४ ३५१ (३) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Arrested for sexually assaulting a young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study