Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक.

Arrested for raping a minor girl

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शहरातील आगरकर मळ्यातून आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुनील अंबादास तांबे (वय ३७, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तसेच पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार होता. आरोपीस अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला असता तो शहरातील आगरकर मळा परिसरात राहत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.

Web Title: Arrested for raping a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here