पत्नीच्या त्रासास कंटाळून लष्करातील जवानाने केली आत्महत्या
पुणे | Pune Crime News: पुणे येथील वानवडी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचास कंटाळून लष्करातील जवानाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी तसेच सासरकडील व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, सध्या.रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. शेलार लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयात नियुक्त होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी सैनिक आवासातील खोलीत आत्महत्या केली.
गोरख शेलार यांचा भाऊ केशव नानाभाऊ शेलार यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शेलार यांची पत्नी अश्विनी तसेच सासरकडील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख शेलार यांचा गेल्या वर्षी अश्विनी पाटील हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अश्विनी हिने पती शेलार यांना त्रास देऊन कौटुंबिक िहसाचार कायद्यावन्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. तिची धमकी तसेच त्रासामुळे शेलार यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ केशव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Army soldier commits suicide due to wife’s harassment