अहिल्यानगर: लष्कराच्या कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: पतीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार.
अहिल्यानगर : पतीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी लष्कराच्या पुरवठा विभागातील हवालदार व सुभेदाराविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
हवालदार वैशाख ओ. पी. व सुभेदार एस. के. रेड्डी (दोघे रा. ५८ सी. एस.एस.पी. सप्लायडेपो किल्ला, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. यातील आरोपी वैशाख याने पीडितेकडे वेळावेळी शरीर सुखाची मागणी करत पुणे येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. तसेच सुभेदार एस. के. रेड्डी याने फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Army personnel abused woman