पहिला सोडून दुसरा लिव्ह इन पार्टनरमध्ये, दुसऱ्याने तिचा काटा काढला, कारण काय?
Nashik Crime: मुलावरुन वाद झाला आणि लिव्ह इन पार्टनरने थेट तिची हत्याच (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक: पहिल्या पतीशी पटत नसल्याने त्याला सोडून आली आणि दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. पण मुलावरुन वाद झाला आणि लिव्ह इन पार्टनरने थेट तिची हत्याच केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्याम अशोक पवार असे अटक आरोपीचे नाव आहे. तर आरती श्याम पवार असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरती पवार हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र पती-पत्नीचे पटत नसल्याने तिचा पती तिला सोडून गेला होता. यादरम्यान तिची श्याम पवारसोबत ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. मग दोघेही आरतीच्या मुलांसह एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांनी आरती आणि श्याममध्येही खटके उडू लागले. यातच श्यामने आरतीच्या मुलाला काही कारणातून चापट मारली. यामुळे आरतीने त्याला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यात संतापाच्या भरात आरोपीने किचनमधील सुरी घेऊन आरतीच्या पाठीत खुपसली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावकारवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Web Title: argument over the child and the live-in partner directly Murder her
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App