संगमनेरात महायुतीने उभारलेली कमान कोसळली; आयोजकांवर गुन्हा दाखल करा
Breaking News | Sangamner: केवळ राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे महाराजांची स्वागत कमान कोसळली.
संगमनेर : तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवजयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर महायुतीने उभारलेली कमान बुधवारी (दि. १९) दुपारी कोसळली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. केवळ राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे महाराजांची स्वागत कमान कोसळली. यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला. असे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड जगाचे दैवत आहे.
भाजप महायुतीने कायम महाराजांचा अपमान केला. महायुतीने उभारलेल्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. महाराजांची प्रतिमा पडणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मुर्तडक यांनी केली.
Web Title: Arch erected by Mahayuti at Sangamner collapsed