Home नाशिक MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा

MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा

Breaking News | Nashik:  नियतीने एकाचवेळी दोन्ही बाजूंनी ‘परीक्षा’ घेतली.

Appeared for the MPSC exam and became parents

नाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी एक दाम्पत्य नाशिकमध्ये रविवारी आले. दोघांची केंद्रे वेगळी होती. परीक्षा केंद्रात पोहोचल्यानंतर महिला परीक्षार्थीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही झाल्याने नियतीने एकाचवेळी दोन्ही बाजूंनी ‘परीक्षा’ घेतली. पण, प्रशासकीय यंत्रणेसह पोलिसांच्या तत्परतेने सारंकाही निभावलं. त्वरित उपचारांमुळे त्या परीक्षार्थीने मुलीला जन्म दिला.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून मालेगावहून युगंधरा व पती गोरख हे रविवारी (दि. १) नाशिकमध्ये परीक्षेसाठी पोहोचले. युगंधरा यांचा कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात, तर गोरख यांचा रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत परीक्षेचा बैठक क्रमांक होता. युगंधरा यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून गोरख त्यांच्या केंद्रावर पोहोचले. सकाळी नऊ वाजेपासून परीक्षा केंद्रात बसलेल्या युगंधरा यांना पेपर सुरू झाल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही सुरू झाला. त्यामुळे पर्यवेक्षक आणि परीक्षार्थींची एकच धांदल उडाली होती.

केंद्र प्रमुखांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हवालदार जयंत जाधव व महिला अंमलदार रोशनी भामरे यांनी धाव घेतली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता केंद्रावरील शासकीय वाहनातून युगंधरा यांना उपचारार्थ पंडित कॉलनीतील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वेद मंदिराजवळील खासगी रुग्णालयात युगंधरा यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, युगंधरा या गट ब वर्गातील अधिकारीपदाची परीक्षा देत होत्या. त्यांनी बीएस्सी ॲग्री पदवी संपादित केली असून, वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले. प्रसूतीची माहिती मिळताच त्यांच्या आई सरला शेवाळे व कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Appeared for the MPSC exam and became parents

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here