Home अहमदनगर शिवसेना राष्ट्रवादीचे नांदा सौख्यभरे, नगर जिल्ह्यात आणखी एक सोयरीक चर्चेत

शिवसेना राष्ट्रवादीचे नांदा सौख्यभरे, नगर जिल्ह्यात आणखी एक सोयरीक चर्चेत

Another soyarik discussion in the Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा हा राजकीय सोयरीकमुळे नेहमीच चर्चेत राहिला असून आणखी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सोयरिक झाली आहे.

बऱ्याच दिवसांपासून चर्चा असलेली नगर जिल्ह्यातील एक राजकीय सोयरिक अखेर जुळून आल्यामुळे जिल्ह्याच्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात आणखी नव्या समिकरणांची भर पडली आहे. त्यामळे येत्या विधानपरिषद निवडणुकीत नातेसंबंधांची झलक पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. उदयन यांनी नगरमध्ये तर निवेदिता यांनी पुण्यात शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदयन नेवासा तालुक्यात राजकारणात सक्रिय झाले आहेत. नगर जिल्हा सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. सर्वच पक्षातील अनेक नेते एकमेकांचे सोयरे आहेत.एक नवीन समीकरण जुळून आले आहे. गडाख आणि घुले यांचे विधानसभा मतदारसंघही शेजारी शेजारी आहेत. महाविकास आघाडीमुळे राजकीयदृष्ट्याही ते एकत्र आलेले आहेत. केवळ ते दोघेच नाहीत तर जिल्ह्यातील अन्य नेत्यांचा गोतावळाही जुळवाजुळव करताना दिसत आहे. नातेसंबंध बाबत सावरासावर व झलक येत्या विधानपरिषद निवडणुकीत चांगलीच रंगणार असून आपल्याला ती पहावयास मिळणार आहे. 

Web Title: Another soyarik discussion in the Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here