पाथर्डी तालुक्यात आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद
पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यात आज शुक्रवारी शिरसाटवाडी येथे आणखी एक बिबट्या दोन वाजेच्या सुमारास जेरबंद झालेला आहे. बिबट्याने तालुक्यात दहशत निर्माण केली आहे.
पाथर्डी तालुक्यात मागील महिन्यापासून बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घातला होता. बिबट्याकडून तीन लहान मुलांची हत्या झाली आहे. तसेच पाळीव प्राण्यांची शिकार देखील केली आहे. तालुक्यात गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अशा नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी राज्यातून नेमबाजांना पाचारण करण्यात आले होते. बिबट्या रात्रीचे शिकार करत असल्याने त्यांना पकडणे मुश्कील झाले होते.
आतापर्यंत तीन बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. शहराच्या जवळच असलेल्या शिरसाटवाडी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात शुक्रवारी दुपारी बिबट्या अडकला. ही माहिती परिसरात पसरल्याने बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नगर येथील वनविभाग कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
Web Title: Another Bibatya caged in Pathardi taluka