Home अकोले सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

Rajur News: गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

Annual sports festival concluded at Sarvodaya Vidya Mandir Rajur

राजूर: गुरूवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे आठ वाजता झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या प्राचार्य भाऊसाहेब बंकर यांनी भूषविले. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून न ५७ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अहमदनगर येथील नायब सुभेदार सुरेश शर्मा तसेच हवालदार नरेंद्र सिंग यांचे हस्ते ध्वजारोहण करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा शाळेच्या क्रीडा प्रांगणात पार पडला.

क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित कापून, धव्जारोहण तसेच नारळ फोडून केले.

यानंतर कार्यक्रमांमध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये कबड्डी, धावणे, थाळीफेक, गोळाफेक, रस्सीखेच, हॉलीबॉल आदी स्पर्धा याप्रमाणे अनेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वर्ग पाचवी ते बारावीच्या विविध विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे व विनोद तारू यांच्या शिस्तबद्ध नियोजनानुसार सर्व शिक्षक व विदयार्थ्याच्या सहकार्याने आंतरशालेय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नायब सुभेदार सुरेश शर्मा यांनी विदयार्थी जिवनातील खेळाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल  बहुमोल मार्गदर्शन केले.

क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, क्रीडा प्रमुख जालिंदर आरोटे व प्रा. विनोद तारू, संजय देशमुख यांसह प्रा. दिपक बुऱ्हाडे, प्रा. संतोष कोटकर, प्रा. शरद तुपविहिरे, प्रा. बीना सावंत, प्रा. स्मिता हासे, प्रा. आरती देशमुख, प्रा. संतराम बारवकर, प्रा. बाळासाहेब घिगे, प्रा. संतोष नवले, प्रा. सुरेश शेटे, प्रा. रविंद्र मढवई, प्रा. सचिन लगड, प्रा. अमोल तळेकर, प्रा. विकास जोरवर, प्रा. सुधिर आहेर, प्रा. संतोष बारामते, प्रा. रविंद्र कवडे, प्रा. सुरेखा नवाळी, प्रा. मधुमंजिरी पवार, प्रा. कांचन सोनार तसेच विदयार्थी आदिंनी परिश्रम घेतले.

Web Title: Annual sports festival concluded at Sarvodaya Vidya Mandir Rajur

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here