शिवसेना ज्याच्या रक्तात होती आणि ज्याचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता अखेर काळाने थांबविला: ठाकरे
मुंबई: अनिल भैय्या गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्याच्या रक्तात होती आणि ज्याचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता अखेर काळाने थांबविला अशा भावपूर्ण शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.
अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालविली हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातला तमाम जनतेनी सुद्धा अनिल भैय्या गमविला आहे.
लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणे हे त्यांच्या स्वभावात असल्यामुळे नगर जिल्ह्यात शिवसेना रुजविली होती. नगर जिल्ह्यात जरी २५ आमदार निवडून येत असले तरी नेहमी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ताच अशी ओळख सांगण्यात अभिमान होता. त्याचा जन्मच लोकांसाठी झालेला होता. अनिल भैया जाण्याने आम्ही एक कट्टर, विश्वासू शिवसैनिक गमविला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Anil Rathod leader who lived for people is gone, Uddhav Thackeray