Home अहमदनगर अहिल्यानगर: प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटली

अहिल्यानगर: प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटली

Breaking News | Ahmednagar: पाथर्डी आगारातील एसटी बस उलटून प्रवासी किरकोळ जखमी झाले, बससमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करीत होते.

An ST bus full of passengers overturned

पाथर्डी: पाथर्डी आगारातील एसटी बस उलटून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये एसटी वाहक, चालक व एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. तालुक्यातील भिलवडे-तिनखडी रस्त्यावर भिलवडे येथून प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला एका बाजूने उलटली. ही घटना शुक्रवारी (दि.११) सकाळी घडली.

पाथर्डी ते पिंपळनेर सकाळची साडेआठची बस नेहमी पाथर्डीहून सुटते. मोहटा, करोडी, भिलवडे, तिनखडी, टाकळीमानूर मार्गे पिंपळनेरला ही एसटी बस जाते. शुक्रवारी सकाळी नेहमीच्या वेळेवर पाथर्डीतून निघालेली बस नऊच्या सुमारास भिलवडे गावातून प्रवासी सोडून व काही प्रवासी घेऊन तीन तिखडीकडे जात असताना अरुंद रस्त्यावर ही बस एका बाजूने उलटली. बससमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करीत होते. अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. या भागात गुरुवारी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील भिलवडे परिसरात रस्त्याच्या बाजूला एसटी बस उलटल्यानंतर बाहेर येताना चालक, वाहक, प्रवासी. पाऊस झाल्याने रस्त्याच्या बाजूची साईडपट्टी चिखलमय बनली होती. त्यानंतर या साईडपट्टीवरून बस घसरून उलटल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुरेश बडे, अमोल बडे, सुभाष बडे व स्थानिक तरुणांनी मदत कार्य केले.

Web Title: An ST bus full of passengers overturned

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here