धक्कादायक! 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या
Breaking News | Nashik Crime: ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
नाशिक: नाशिकच्या गंधर्व शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, ,अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आरोपीनं 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलाला फेकून दिलं. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या बांधकाम साईडवर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण नाशिक शहर गोंधळात टाकले आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांच्या दोन-तीन पथके पाठवण्यात आली आहेत आणि आता आरोपींचा शोध सुरू आहे. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या घटनेने कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.
Web Title: An 8-year-old boy was murdered by unnatural abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News