संगमनेर: रुग्णवाहिकेची एसटी बसला धडक, रुग्ण ठार तर चौघे जखमी
Breaking News | Sangamner Accident: अपघातातील जखमी रुग्णाला उपचारांसाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोराची धडक, जखमी रुग्णाचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कोंची येथील अपघातातील जखमी रुग्णाला उपचारांसाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये जखमी रुग्णाचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले आहेत. सदर भीषण अपघात कोकणगाव शिवारात रविवारी (दि. २६ मे) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडला आहे.
कोंची येथे दुचाकीचा अपघात होऊन बाळासाहेब धोंडीराम गिते (वय ५५, रा. कोंची) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ रुग्णवाहिका बोलावली होती. सदर रुग्णवाहिका जखमीला घेऊन संगमनेरला येत असताना कोकणगाव शिवारात हयगयीने वाहन चालवून बसला (क्र. एमएच.१४, बीटी. ३८०) समोरुन जोराची धडक दिली.
यामध्ये जखमी रुग्ण बाळासाहेब गिते यांचा मृत्यू झाला तर गणेश लहानू गिते, संदीप भाऊसाहेब गिते, रुग्णवाहिका चालक व बसचालक किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी बसचालक सुनील शांतिलाल सोनवणे (वय ४५, रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका, संपत जायभाये हे करत आहेत.
Web Title: Ambulance collided with ST bus Accident, patient killed and four injured
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study