राज्यातील या भागात अलर्ट, चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता- Rain Alert
मुंबई: येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात विविध भागात मुसळधार पाउस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता हवामान खात्याने
येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
IMD:-
येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता.
या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता.
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस
Web Title: Alert for four to five days of torrential rain in this part of the maharashtra