अकोले युवक काँग्रेसचे नगरपंचायतीला निवेदन
अकोले युवक काँग्रेसचे नगरपंचायतीला निवेदन
अकोले: स्वच्छ पाणी पुरवठा व पाणी पुरवठा जल शुद्धीकरण केंद्रावरील स्वच्छता व तेथील विविध समस्यांचे बाबतीत अकोले शहर युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष निखिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायातीला निवेदन देण्यात आले.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
अकोले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अत्यंत बिकट असल्याची दिसून येतेय. पाणी पुरवठा होत असलेल्या जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी युवक काँग्रेस चे अध्यक्ष निखिल जगताप यांनी केली तेथे अनेक समस्या लक्ष्यात आल्या त्यात प्रामुख्याने पाणी पुरवठा करताना त्यामध्ये तुरटी व ब्लिचिंग पावडर चे योग्य ते प्रमाण बंधनकारक आहे परंतु, तेथील पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रावर एक ठिकाणी तुरटी व ब्लिचिंग पावडर सोडली जाते व एका ठिकाणी तेथील उपकरण अनेक दिवसांपासून बंद असल्या कारणाने ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता केवळ तुरटीच सोडली जाते या प्रक्रियेत सुधारणा होऊन शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे पाणी मिळावे व जलशुद्धीकरण केंद्रावरील असणाऱ्या लोखंडी पायऱ्यांची विल्हेवाट लावून भक्कम जिन्याची बांधणी करावी जेणे करून कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा होणार नाही व तेथील परिसराची स्वच्छता करावी या करिता अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांना निवेदन देण्यात आले.
You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images
या वेळी राजेंद्र ठावरे, नितीन जगताप, प्रतीक वाकचौरे, नितीन वाकचौरे,संतोष आचार्य, विकी घोडके, राशीद सय्यद, असिफ शेख, विजय रुपवते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.