Home अकोले आंभोळ महिला मृत्यूप्रकरणी दोघांना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी

आंभोळ महिला मृत्यूप्रकरणी दोघांना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Akole Two remanded in police custody for two days

अकोले | Akole News: तालुक्यातील आंभोळ येथील महिला मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोन  युवकांना आज न्यायालयापुढे उभे केले असता, दोघांना येत्या दोन तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की कांताबाई तुकाराम जगधने वय ६५ या महिलेच्या घराची कौले चाळण्यास आलेल्या दोघा युवकांनी महिलेच्या प्रतिकारामुळे दागिने चोरताना तिची हत्या केली आणि प्रत्यक्षदर्शीनी ही त्यांना ओळखले म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

त्यांच्या अटकेनंतर त्यांना आज दुपारी अकोले पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना येत्या दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.

Web Title: Akole Two remanded in police custody for two days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here