Home अकोले अकोले तालुक्यातील युवक बेपत्ता, परीसरात मानवी तस्करीच्या चर्चेला उधाण

अकोले तालुक्यातील युवक बेपत्ता, परीसरात मानवी तस्करीच्या चर्चेला उधाण

Akole Taluka Young Man Missing:  एक कातकरी समाजाचा युवक गत दहा दिवसांपासून बेपत्ता असुन राजुर पोलीस स्टेशनला मिसिंग असल्याची तक्रार दाखल.

Akole taluka youth goes missing, sparks discussion of human trafficking 

भंडारदरा: अकोले तालुक्यातील शेणित पेहरे येथील एक कातकरी समाजाचा युवक गत दहा दिवसांपासून बेपत्ता असुन राजुर पोलीस स्टेशनला मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु सदर युवक बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून मानवी तस्करीची चर्चा परीसरात सुरु आहे.

अकोले तालुक्यातील शेणित पेहरे (ठोकळवाडी) या ठिकाणी एक कातकरी समाजाचे कुटुंब राहत असुन या कुटुंबातील नवसु लक्ष्मण हिलम (वय ३०) याला गावातीलच एका व्यक्तीन मटन आणण्याच्या नावाखाली मोटार सायकलवर बसवुन नेले. नवसुच्या आई वडिलांनी रात्री उशिरापर्यंत वाट बघुनही नवसु परत आला. नसुन आजपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. नवसुची सर्वत्र शोधाशोध करुनही तपास न लागल्याने शेवटी नवसुचे वडील लक्ष्मण हिलम यांनी राजुर पोलीस स्टेशन गाठत मिसिंगची तक्रार दाखल केली.

स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर नवसुला नेणाऱ्या युवकाने दुसऱ्या दिवशी दहा हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नवसुच्या वडिलांनी सांगितले असुन नवसुला नेणाऱ्या युवकानेच कुणाला तरी विकले किंवा घातपात केला असण्याची शक्यताही नवसुच्या वडिलांनी बोलुन दाखविली आहे. तर नवसुला मटन आणण्याच्या नावाखाली नेणारी व्यक्ती गावात राजरोसपणे फिरत असल्याचेही समजते आहे. या अगोदरही ईगतपुरी तालुक्यात पाच हजार रुपयांसाठी कातकरी समाजाच्या मुलांची विक्री झाली. असल्या कारणाने नवसुचा असाच प्रकार झाला असण्याच्या चर्चेला परीसरात उधान आले आहे. नवसुच्या बेपत्ता प्रकरणात राजुर पोलिसांनी बारीक लक्ष टाकले असुन एका व्यक्तीला तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती राजुर पोलिसांनी दिली. बेपत्ता युवकाचा तपास सुरु असुन नवसुच्या मिसिंग तक्रारीची तातडीने दखल घेऊन ही केस निकाली काढणार असल्याचे राजुर नवसुच्या वडिलांनी राजुर पोलीस पोलिसांनी सांगितले.

Web Title: Akole taluka youth goes missing, sparks discussion of human trafficking 

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here