अकोले तालुक्यात आज दिवसभरात आठ रुग्ण करोनाबाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज दिवसभरात आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची करोनाबाधितांची संख्या २१६ इतकी झाली आहे.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून सकाळी पाच पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यात कोतूळ येथील करोनाने मयत व्यक्तीची ३५ वर्षीय पत्नी, पाच वर्षीय मुलगा, शहरातील शिवाजीनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, देवठाण येथील ५० वर्षीय पती, ४५ वर्षीय पत्नी अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यांनतर दुपारी खानापूर कोव्हीड सेंटर रॅपिड अॅटीजेन टेस्ट मध्ये शिवाजीनगर येथील ४९ वर्षीय महिला, कोतूळ येथील ३० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला असे तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात सध्या ५३ जणांवर उपचार सुरु आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत १५८ जण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली आहे.
Web Title: Akole taluka today eight Corona infected today
Get Latest Marathi News and Ahmednagar News