अकोले तालुक्यात आठशे करोनाबाधितांचा टप्पा पार, आज तब्बल ५७ रुग्ण
अकोले: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी प्राप्त अहवालात ५७ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याने आठशेचा टप्पा पार केला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ८१६ पोहोचली आहे.
ब्राम्हणवाडा येथील ४० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, अंभोळ येथील ६२ वर्षीय महिला, मोग्रस येथील ४३ वर्षीय महिला, गर्दनी येथील १७,३७,३०,४२,२५ वर्षीय महिला, ८ वर्षीय बालक, १० वर्षीय बालिका, ४८ वर्षीय पुरुष, अकोले शहरातील ६२ वर्षीय महिला, ६४,३५,४८ वर्षीय महिला, ९ वर्षीय बालक, ढोकरी येथील ५२,३२ वर्षीय पुरुष, ६०, ३० वर्षीय महिला, शेंडी ४६ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, देवठाण येथील ३५ वर्षीय, वरखडवाडी येथील ६४ वर्षीय महिला, कळस येथील ३९ वर्षीय पुरुष, अकोले शहरातील ३३, ३०,५७,५६ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथील ७२ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, वृंदावन कॉलनी येथे ४१ वर्षीय पुरुष, अकोले शहरातील १९, ३७ वर्षीय महिला, सुगाव बुद्रुक ३८ वर्षीय महिला, नवलेवाडी येथील ३९,३६,५०,१९ वर्षीय पुरुष, ४६,२२ वर्षीय महिला, पाडाळणे येथील ७४,४०,६५,१९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, ९ वर्षीय बालक, ६० वर्षीय महिला, लिंगदेव येथील ४२ वर्षीय पुरुष, अकोले शिवाजी चौक येथील ५८ वर्षीय महिला, इंदिरानगर येथील ४८ महीला, कोहने येथील ४७ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील ८३ वर्षीय पुरुष, विठे ६४ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ६५ वर्षीय पुरुष, गणोरे येथील ५८ वर्षीय महिला असे एकूण ५७ रुग्ण आज दिवसभरात आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधीतांची संख्या ८१६ इतकी झाली आहे.
Web Title: Akole Taluka Today 57 corona infected