अकोले तालुक्यात या दोन गावांतच आढळले 10 रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १२ करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये समशेरपूर येथे चार, धामणगाव पाट येथे सहा, गणोरे येथे एक तर रुंभोडी येथे एक करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याने २४ वे शतक ओलांडले आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुंभोडी येथे ४४ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे १०,३४,७१ वर्षीय पुरुष तर ६२ वर्षीय महिला, गणोरे येथे ६४ वर्षीय महिला, धामणगाव पाट येथे ३०,४५,४०,४५ वर्षीय पुरुष, ३१ व ३५ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
आज तालुक्यात एकूण १२३ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १२ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २४०३ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka this two area 10 infected