अकोले तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे गुटका विक्रेत्यांवर कारवाई करणार
अकोले तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे गुटका विक्रेत्यांवर कारवाई करणार
अकोले तालुक्यात तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला आहे. अकोले तहसील कार्यालयात तंबाखू विक्रेत्यांना शपथ देण्यात आली आहे. तंबाखू न खाण्याचे आवाहन अकोले तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे. यावेळी दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी, पत्रकार संघाचे श्रीनिवास रेणुकादास, नंदकुमार मंडलिक उपनिरीक्षक नितीनकुमार बेंद्रे आदींसह कार्येकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित होते.
अकोले तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तंबाखू विक्रेत्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी तंबाखू हे जगभरातील मानवाचे नुकसान करणारा पदार्थ आहे. लाखो लोकांचे प्राण तंबाखू गेलेले आहे, यावर कुठेतरी बंदी घालण्यासाठी तंबाखू दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्राची जवळपास १२ कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी अडीच कोटी लोक तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसनी आहेत. भारतातील जवळपास १५ लाख लोक तंबाखू खाल्याने मृत्यूमुखी पडलेली आहेत म्हणून शासनाने व प्रशासनाच्या वतीने गुटखा बंदी केलेली आहे कायद्याने गुटका बंदी केलीली आहे गुटका बंदी का आहे हे समजवण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
२००३ पासून शासनाने गुटका बंदी केलेली आहे, गुटका पासून कर्करोग होतात अनेकांचे घरे उध्वस्त झालेली आहे. अवैध मार्गाने गुटका महाराष्ट्रात येतो आणि विक्रेते बेकायदेशीर मार्गाने विकतात. दुकानदारांना आवाहन करण्यात आले की, अवैध मार्गाने गुटका विकणे बंद करावे अन्यथा गुटका विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.