Akole: अकोले तालुक्यात १२ वा मृत्यू तर १६ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: तालुक्याला पुन्हा एक हादरा बसला आहे. तालुक्यातील राजुर येथील ५७ वर्षीय महीलेच्या रूपाने तालुक्यातील कोरोनाने १२ वा बळी गेला तर तालुक्यात आज १६ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ७५९ इतकी झाली आहे.
सकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ८० वर्षीय महीलेचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील शाहूनगर येथील ३२ वर्षीय पुरुष,पाडाळणे येथील ७५ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय तरुण, १७ वर्षीय युवती, शेंडी येथील २५ वर्षीय तरुण, टाहाकारी येथील ४५ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवती, २१ वर्षीय महीला, समशेरपुर येथील ५५ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात धामणगाव पाट येथील २७ वर्षीय तरुण, ६४ वर्षीय पुरूष, वरखडवाडी (देवठाण) येथील २६ वर्षीय तरुण, टाकळी येथील ४१ वर्षीय पुरूष, तांभॊळ येथील ४० वर्षीय पुरुष अशा आज एकुण १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ७५९ झाली आहे.तर आत्तापर्यंत ६१६ व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी गेलेत. १२ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १३१ व्यक्ती उपचार घेत आहे.
Web Title: Akole taluka one death 16 corona infected today