Home अकोले अकोले: तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांत सर्वोदय खिरविरेचे यश.

अकोले: तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांत सर्वोदय खिरविरेचे यश.

अकोले: तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांत सर्वोदय खिरविरेचे यश.

अकोले :-विदयार्थ्यांना दैनंदिन उपक्रमांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारिरीक विकासही महत्वाची भुमिका बजावतो. याच उद्देशाने शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये सामुहिक तसेच वैयक्तिक विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर देखील स्पर्धा पार पडतात.
नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय वैयक्तिक क्रिडा स्पर्धांत सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता.अकोले) येथील विद्यालयाने चांगलेच यश संपादन केले आहे.
या वैयक्तिक क्रिडा स्पर्धांत सोनाली भांगरे हिने १५००मीटर धावणे या स्पर्धांमध्ये प्रथम तर ३००० मीटर मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सिमा बेणके हिने ४०० मीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. कविता साबळे हिने ४०० मीटर मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. स्वप्ना धांडे हिने ४०० मीटर तसेच ८०० मीटर मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. वंदना साबळे हिने लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.संदिप भांगरे याने ५००० मीटर मध्ये तृतीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे कुस्तीमध्ये अनामिका पराड, प्रेमराज झोले, अंकुश उघडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला असुन या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक संपत धुमाळ,प्रा.विक्रम आंबरे,प्रा. सचिन लगड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक क्रिडा शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा, सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत, जेष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णी तसेच दिपक पाचपुते, भरत भदाणे, कविता वाळुंज, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे,प्रा. रामदास डगळे,प्रा. संजय देशमुख,प्रा.सौरभ बेणके, सुभाष बेणके,पि.के. बेणके, सुनिल देशमुख आदिंनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here