अकोले तालुक्यात कोल्हार घोटी रोडवर बोलेरो व डंपर यांच्यात भीषण अपघात एक ठार दोन जखमी
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर इंदोरी फाट्याजवळ बोलेरो गाडी व डंपर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सोमवारी चार वाजेच्या सुमारस घडला. या अपघातात एक ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.
निळवंडे धरणाच्या मालाची वाहतूक करणारा डंपर आणि बोलेरो यांच्यात सामोरासमोर अपघात झाला आहे. मुस्कान शेख यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर सोहेल शेख व जातीया शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बोलेरो गाडीतील कुटुंब हे रुंभोडी येथील असल्याचे समजते. या अपघातात बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम सुरु असल्याने या भागात नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे.
Web Title: Akole Taluka indori bolero and dampar Accident