Home अकोले अकोले तालुक्यात आज सर्वाधिक कोरोना तब्बल ६८ व्यक्ती  बाधित

अकोले तालुक्यात आज सर्वाधिक कोरोना तब्बल ६८ व्यक्ती  बाधित

Akole Taluka Highest 68 corona infected today

अकोलेत सोमवार पासून सात दिवस जनता कर्फ्यु..

तालुक्याची रुग्णसंख्या गेली आठव्या शतकाच्या पुढे!

अकोले: तालुक्याला काल गुरुवार नंतर आज शुक्रवारीही पुन्हा मोठा हादरा बसला असुन शहरातील थिएटरजवळील ३२ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर आज तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

काल अकोले तालुक्यात राजुर व पाडाळणे येथील अशी दोन व्यक्तीचा कोरोना उपचार सुरु असताना मृत्यू झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी शहरातील थिएटर जवळील ३७ वर्षीय तरुणाचा संगमनेर येथील रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनाने १४ वा बळी गेला आहे.

आज अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील वृदांवण कॅालणीतील ६४ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महीला, ३५ वर्षीय महीला, ४८ वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा, तर शहरातील ३३ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील ४६ वर्षीय महीला, २२ वर्षीय महिला,१९ वर्षीय तरुण, गर्दणी येथील ३७ वर्षीय महीला,३० वर्षीय महीला,४२ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती, १० वर्षीय मुलगी, ४८ वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगा,ब्राम्हणवाडा येथील ४० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला,मोग्रस येथील ४३ वर्षीय पुरूष, अभोळ येथील ६२ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ५२ वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ३० वर्षीय महीला,शेंडी येथील ४६ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय तरुण, देवठाण येथील ३६ वर्षीय पुरुष, कळस येथील ३९ वर्षीय पुरूष, अशी ३० व्यक्तीचा तर

सकाळी  घेण्यात  रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये  शहरातील वृदांवण कॅालणीतील ४१ वर्षीय पुरूष, शिवाजी चाैकातील ५८ वर्षीय महीला,शहरातील ३७ वर्षीय महिला,अकोले कोर्टातील ५७ वर्षीय पुरूष, ५६ वर्षीय पुरुष,टाकळी येथील १९ वर्षीय युवती, सुगाव बु येथील ३८ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ३९ वर्षीय पुरुष,३६ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरुष, समशेरपुर येथील ३२ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महीला,वरखडवाडी(देवठाण) येथील ६४ वर्षीय महील,पाडाळणे येथील ७४ वर्षीय पुरूष,६५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,६० वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा,१९ वर्षीय तरुण,लिंगदेव येथील ४२ वर्षीय पुरुष अशी २१ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली तसेच खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या  अहवालात शहरातील इंदिरानगर येथील ४८ वर्षीय महीला,धुमाळवाडी येथील ८३ वर्षीय पुरूष,,कोहणे येथील ४७ वर्षीय पुरूष, इंदोरी येथील ६५ वर्षीय पुरूष, विठा येथील ६४ वर्षीय पुरूष, गणोरे येथील ५८ वर्षीय महिला, अशी ०६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर राञी उशिरा अहमदनगर शासकिय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील २३ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला,कळस येथील ६५ वर्षीय पुरूष, राजुर येथील ७५ वर्षीय महीला, ४९ वर्षीय महीला, २१ वर्षीय युवती, ३९ वर्षीय महीला, ११ वर्षीय युवक, ४९ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय युवती अशी ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आलेने आज शुक्रवारी दिवसभरात तालुक्यात आत्तापर्यंतची एका दिवसात सर्वाधिक तब्बल ६८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या आठव्या शतकाच्या पुढे म्हणजेच ८२७ झाली आहे. तर आत्तापर्यंत ६३५ व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी गेलेत १४ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १७७ व्यक्ती उपचार घेत आहे.

तालुक्यात  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य घेऊन अकोलेचे, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, अध्यक्ष  व्यापारी, सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाचे सहकार्याने सोमवार दि.१४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यत ०७ दिवसाचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे.

अलताफ ईस्माईल शेख
संपर्क (७३८७०२०५९७) 
पञकार, अकोले

Web Title: Akole Taluka Highest 68 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here