अकोले तालुक्यात याठिकाणी आढळून आले करोनाबाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात खानापुर, नवलेवाडी, धुमाळवाडी, रेडे या ठिकाणी १० जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २३८९ इतकी झाली आहे.
तालुक्यात खानापुर येथे ४९ वर्षीय पुरुष,, नवलेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ४९,५९ व १६ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, ३ वर्षीय बालक, रेडे येथे २४ वर्षीय पुरुष, ७ वर्षीय बालिका, ३५ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
आज तालुक्यात एकूण ५६ चाचणी घेण्यात आल्या. त्यामध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर काल १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची संख्या काही प्रमाणत कमी झालेली दिसून येत आहे. शहरात संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी गर्दी करू नये अन्यथा बाधित वाढण्यास वेळ लागणार नाही तरी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन प्रशासन करीत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka Here Found corona infected