Akole: अकोले तालुक्यात आज १५ व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज नवीन १५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोले तालुक्याची करोनाबाधितांची संख्या ५२७ इतकी झाली आहे.
तालुक्यात आज देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये गणोरे येथील ३८ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, ०८ वर्षीय मुलगा, पिंपळगाव निपाणी येथील ३० वर्षीय पुरूष अश्या चार व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर धामणगाव आवारी येथे घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टध्ये आदिवासी भागातील वारंघुशी येथील ३५ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला धुमाळवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय मुलगा, ३१ वर्षीय महीला अश्या पाच व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात गर्दणी येथील ६० वर्षीय पुरुष व धुमाळवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष अशी ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तसेच सायंकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ५७ वर्षीय महीला, कोतुळ येथील ३० वर्षीय महीला, १६ वर्षीय तरुणी, १५ वर्षीय युवक अशी ०४ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली असुन आज रविवारी दिवसभरात एकुण १५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५२७ झाली आहे.
पत्रकार: अल्ताप शेख (7387020597)
Web Title: Akole taluka Coronavirus update Sunday