Akole Taluka Corona: अकोले तालुक्यात करोना २३ शतकी पार
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज २० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याने २३ वे शतक ओलांडून एकूण संख्या २३१२ वर पोहोचली आहे.
आज अॅटीजेन चाचणीत १२ तर खासगी प्रयोगशाळेतून ८ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये नवलेवाडी येथे ७६ वर्षीय पुरुष, भंडारदरा येथे ४०,३६,५० वर्षीय पुरुष, कळंब ६७ वर्षीय पुरुष, अकोले ३९ वर्षीय पुरुष, सावरगाव पाट २१,१७,७०,९० वर्षीय महिला, ठाणगाव सिन्नर येथे ४८ वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला, लाहित बुद्रुक येथे ६६ वर्षीय पुरुष, धामणगाव पाट ५१ वर्षीय महिला व ५७ वर्षीय पुरुष, उंचखडक बुद्रुक ६० वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ६० वर्षीय महिला, धामणगाव ४० वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ८० वर्षीय पुरुष, ढोकरी येथे ३६ वर्षीय पुरुष असे २० जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २३१२ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka corona upadate news today 4 Nov