Home अकोले Akole: अकोले तालुक्यात कोरोनाचा २६ वा मृत्यू

Akole: अकोले तालुक्यात कोरोनाचा २६ वा मृत्यू

Akole Taluka Corona report 30 infected one death

अकोले | Akole: गुरुवारी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल व ॲन्टीजन टेस्टमध्ये  तालुक्यात ३० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

शहरातील ४५ वर्षीय व्यक्तीचा ४ ऑक्टोबर रोजी कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर उपचार सुरू असताना गुरवारी निधन झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा २६ वा बळी गेला आहे.  तालुक्याची  एकुण रुग्णसंख्या १७७९ इतकी झाली आहे.

आज गुरुवारी सकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील ४५ वर्षीय महीला, २४ वर्षीय महीला, ४४ वर्षीय पुरूष,२९ वर्षीय तरुण,११ वर्षीय मुलगी, मेहंदुरी येथील ६५ वर्षीय महीला, २३ वर्षीय तरुण, वाशेरे येथील ३० वर्षीय पुरूष, धामणगाव आवारी येथील ४० वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय महीला, ०३ वर्षीय मुलगी, अकोले शहरातील ३८ वर्षीय पुरूष, कारखाना रोड वरील ११ वर्षीय मुलगा, ३४ वर्षीय महीला, पिंपळगाव निपाणी येथील २९ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ५२ वर्षीय महीला, २५ वर्षीय महीला अशी १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.

तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये चैतन्यपुर येथील १८ वर्षीय तरूण, वाघापूर येथील ३५ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ७० वर्षीय पुरूष,  ७१ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, लहीत येथील ३६ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महीला, १२ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगा, मेहंदुरी येथील २७ वर्षीय पुरूष, २५ वर्षीय महीला, अंबड येथील ५० वर्षीय पुरूष, मुरशेत येथील ४५ वर्षीय महीला अशी १३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने दिवसभरात एकुण ३० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka Corona report 30 infected one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here