अकोले तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांत वाढ सुरूच
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३३४९ इतकी झाली आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात गणोरे येथे ६९ वर्षीय महिला, अकोले येथे ४० वर्षीय महिला, सुगाव बुद्रुक येथे ४८ वर्षीय महिला, शिवाजीनगर धुमाळवाडी येथे ५७ वर्षीय पुरुष, इस्लाम पेठ अकोले येथे २५ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४५२ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
Web Title: Akole Taluka Corona Positive Patient today five