Akole: अकोले तालुक्यात करोनाने ओलांडला तीन हजारांचा आकडा
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १९ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज तालुक्यात ६६ चाचणी करण्यात आल्या यामध्ये सात जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत तर ३ जण खासगी अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय अहवालात ९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अकोले तालुक्याची एकूण करोनाबाधित रुग्ण संख्या तीन हजार पार झाली असून ३०१२ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ४२ वर्षीय महिला, देवठाण येथील ४० व ४७ वर्षीय महिला, ७५,५६ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ५१,३२,४७,३९ वर्षीय पुरुष, १५,२४,५८ वर्षीय महिला, विठा येथे ४७,६८ व ३४ वर्षीय पुरुष, ३०, ३४ वर्षीय महिला, कोतूळ येथे ३६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka Corona patient Ahead three Thousand