अकोले तालुक्यात आई वडील व पत्नीस मारहाण करत तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन मुलगा पसार
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील अंभोळ येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारू पिलेल्या मुलाने आई वडिलांसह पत्नीस कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना अंभोळ येथे घडली आहे.
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात इंदुबाई संपत चौधरी वय ५५ रा. अंभीळ यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक ४ ऑगस्ट रोजी अंभोळ येथे इंदुबाई, त्यांचे पती संपत चौधरी व सून मीना चौधरी असे त्याचे घरी असताना फिर्यादीचा मुलगा दिलीप संपत चौधरी याने दारू पिऊन घरी येऊन आई, वडील, पत्नी यांस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन दिलीप हा त्याची पत्नी मीना हिचे तीन तोळ्याचे दागिने व घरातील एक पायली कांद्याचे बियाणे घेऊन फरार झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोराणे हे करीत आहे.
Web Title: Akole taluka, beating a mother, father and wife