Home अकोले अकोले तालुक्यात आज दिवसभरात ६ कोरोना बाधित, सहावा बळी

अकोले तालुक्यात आज दिवसभरात ६ कोरोना बाधित, सहावा बळी

Akole taluka 9 Corona infected one death

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज दिवसभरात ६ करोनाबाधित आढळून आले आहेत. यात तालुक्यातील मोग्रस, कोतुळ येथील व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या २२७ झाली आहे. त्यापैकी १६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले ०६ मयत झालीय तर ५३ व्यक्तीवर उपचार सुरू आहे.

तालुक्यातील खानापुर कोविड सेंटर येथे आज बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये सहा व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये मोग्रस येथील ४७ वर्षीय पुरुष तर कोतुळ येथील २६ वर्षीय, २८ वर्षीय व ३० वर्षीय पुरुष तसेच ३० वर्षीय महीला आणि केवळ दिड वर्षीय लहान बालकाचा अशी सहा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यात आज दिवसभरात ६ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आलेला आहे.

अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर उपचार करुन बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. माञ गेल्या आठवड्यात तब्बल तिन व्यक्ती कोरोञाशी झुंज देताना इतर आजाराचा प्रादुर्भाव असल्याने अपयशी ठरलेत. दोन दिवसांपूर्वी कोतुळ येथील तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर आज बुधवार १२ ॲगस्ट रोजी इंदोरी फाटा परिसरातील एका उद्योजकाचे ७४ वर्षीय वडिलांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असुन. त्यांचा नुकताच चार- पाच दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरु असतानाच त्याचे निधन झाले आहे

Web Title: Akole taluka 6 Corona infected one death

Get See:  Latest Marathi News  and Share News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here