Home अकोले अकोले तालुक्यात एकाच दिवशी ३८ व्यक्ती कोरोनाबाधितांची वाढ

अकोले तालुक्यात एकाच दिवशी ३८ व्यक्ती कोरोनाबाधितांची वाढ

Akole taluka 38 corona infected Saturday 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी ३८ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. तालुक्यात बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. तालुक्याचा करोनाबाधितांचा आकडा हा १३५२ वर पोहोचला आहे.

शनिवारी सकाळीच अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवाल आले असुन यामध्ये कळस बु येथील ४८ वर्षीय महीला,२३ वर्षीय महीला, बहिरवाडी येथील ४३ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महीला,११ वर्षीय मुलगा,अकोले शहरातील ४० वर्षीय पुरूष,  सुगाव बु येथील ४० वर्षीय पुरूष, २८ वर्षीय तरुण,रुंभोडी येथील ६७ वर्षीय पुरुष,३७ वर्षीय महीला,रेडे येथील ६७ वर्षीय पुरूष,३० वर्षीय महीला, कळस खुर्द येथील २९ वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महीला,इंदोरी येथील १२ वर्षीय मुलगा,नवलेवाडी येथील ४८ वर्षीय महीला, अशी १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर दुपारी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये हिवरगाव आंबरे येथील ०४ वर्षीय मुलगा,राजुर येथील ६२ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगा,४० वर्षीय महीला,४२ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,१८ वर्षीय युवती,११ वर्षीय युवती,१५ वर्षीय युवती,निब्रळ येथील ३४ वर्षीय महीला,४६ वर्षीय पुरूष, बहिरवाडी येथील ६८ वर्षीय महीला,३४ वर्षीय महीला,१८ वर्षीय तरूण, कळस येथील ६५ वर्षीय महीला,कोतुळ येथील ४३ वर्षीय महीला,वारंघुशी येथील ३२ वर्षीय महीला,अशी १८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.सायंकाळी पुन्हा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अैरंगपुर येथील ३७ वर्षीय पुरूष, शहरातील ४७ वर्षीय महीला, नवलेवाडी येथील ४८ वर्षीय महीला अशी ०३ व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात ३८ व्यक्तीचा  कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या १३५२ झाली आहे.

अलताफ ईस्माईल शेख
संपर्क (७३८७०२०५९७) 
पञकार, अकोले

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Akole taluka 38 corona infected Saturday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here