Akole: अकोले तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी ३५ करोना रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ३५ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १५३९ इतकी झाली आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील माळीझाप येथील १७ वर्षीय तरूण, कोतुळ येथील ७५ वर्षीय महीला, ५१ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला,२३ वर्षीय महीला,सावंतवाडी येथील १७ वर्षीय तरूण, तांभोळ येथील ६० वर्षीय महीला,३३ वर्षीय महीला,०५ वर्षीय मुलगा,कळस येथील ४९ वर्षीय पुरूष ५५ वर्षीय महीला, ४२ वर्षीय महीला,पानसरवाडी येथील १९ वर्षीय तरूण अश्या १३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह प्राप्त झाला आहे.
तर तालुक्यातून घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन चाचणीमध्ये शहरातील शिवाजी चाैक येथील ६५ वर्षीय महीला, राजुर येथील ४३ वर्षीय महीला, ११ वर्षीय युवती , जुन्नर येथून आलेला ७३ वर्षीय पाहुणी महीला, ब्राम्हणवाडा येथील ५३ वर्षीय महीला, ४१ वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय तरूण, चितळवेढे येथील ५१ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय महीला, शेंडी येथील २५ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महीला, टाहाकारी येथील ५० वर्षीय महीला, ८० वर्षीय महीला, २५ वर्षीय तरूण, २१ वर्षीय तरुण, ३० वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष अशी १९ पॉझिटिव्ह आढळून आलेली आहेत.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर येथील ४१ वर्षीय महीला, सुगाव बु येथील ५७ वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथील ३३ वर्षीय पुरूष अशा ०३ सह ३५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka 35 corona infected update news