अकोले तालुक्यात आज उच्चांकी २५ कोरोना बाधित
अकोले: शहरातील ०५ व्यक्तीसह तालुक्यात आढळले एकुण तब्बल २५ व्यक्ती कोरोना बाधित. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३४८ झाली आहे.
आज गुरूवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधील अहवालात शहरातील तब्बल ०७ व्यक्ती व हिवरगाव आंबरे येथील ०४ व ब्राम्हणवाडा येथील ०१ अशी १२ व्यक्ती पॅाझिटीव्ह आले तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ५५ वर्षीय पुरुष, ७७ वर्षीय महिला, इंदोरी येथील ५६ वर्षीय पुरुष, कळस येथील २५ वर्षीय तरुण, ४४ वर्षीय महीला, लहीत येथील ३२ वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील ५२ वर्षीय पुरुष, चास येथील ४४ वर्षीय पुरुष अश्या आठ जणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील अकोले कॅालेजजवळील ४९ वर्षीय पुरुष, २१पुरुष, ७० वर्षीय महीला, ४६ वर्षीय महीला, २३ वर्षीय महीला अशी ०५ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली आहेत आज दिवसभरात एकुण २५ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत.