अकोले तालुक्यात आजही २२ व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Akole: तालुक्याची एकुण संख्या पोहचली एक हजाराजवळ ! एकुण रुग्णसंख्या ९९०, शहरालगत माळीझाप, शेकईवाडी, धुमाळवाडी रोडला कोरोना बाधित.
तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये मन्याळे येथील ३६ वर्षीय पुरूष, ०६ वर्षीय मुलगा, बेलापुर येथील ४५ वर्षीय महीला, राजुर येथील ४१ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, २४ वर्षीय महीला,पाडाळणे येथील ६० वर्षीय पुरूष, १० वर्षीय मुलगी, समशेरपुर येथील ३४ वर्षीय पुरूष, सावरगाव पाट ८० वर्षीय पुरूष, २९ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महीला, गणोरे येथील ५८ वर्षीय पुरूष अशी १४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात गर्दणी येथील ७५ वर्षीय पुरुष, शहरालगत माळीझाप येथील ०५ वर्षीय मुलगा, शेकईवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष, धुमाळवाडी रोडवरील २३ वर्षीय पुरूष, गणोरे येथील ३० वर्षीय पुरूष, ०२ वर्षीय मुलगी, राजुर येथील ६७ वर्षीय पुरूष, मनोहरपुर येथील ५४ वर्षीय पुरूष, अशा आठ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने आज दिवसभर २२ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
तर आज तालुक्यातुन ४५ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.त्याचा उद्या सायंकाळी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ९९०झाली आहे.त्यापैकी ७७४ व्यक्ती बरे होऊन घरी गेलेली आहे.तर १९९ व्यक्ती उपचार घेत असुन आत्तापर्यंत १७ व्यक्ती कोरोनाने मयत झालेली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka 22 corona positive today