अकोले तालुक्यात कोरोना बाधितांचे कोरोना ने १९ बळी गेले तर एक सहस्ञक पूर्ण
अकोले: तालुक्यात आजही २३ व्यक्ती कोरोना बाधित. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १०१३ झाली आहे.
काल बुधवारी तालुक्यातील इंदोरी येथील ६८ वर्षीय पुरूषाचा अहमदनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर आज गर्दणी येथील ७५ वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने आता पर्यत कोरोनाने १९ वा बळी गेला आहे. अकोले करानो सावधान व्हेंटीलेटर न मिळाल्यानेही मृत्यू होण्याचे घटना घडत आहे. व्हेंटीलेटर बेड रूग्णालयात मिळत नाही तेव्हा काळजी घ्या सुरक्षित रहा.
तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये गणोरे येथील ५२ वर्षीय महीला, ३० वर्षीय महीला, २८ वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरुष, ०५ वर्षीय मुलगा, ०४ महिन्याचे बाळ,विरगाव येथील ३७ वर्षीय पुरूष, १० वर्षीय मुलगा,०३ वर्षीय मुलगी,३६ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष, रेडे येथील २५ वर्षीय तरुण,कोतुळ येथील ४६ वर्षीय महीला,अंभोळ येथील ३५ वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील २१ वर्षीय तरुण, ३० वर्षीय महीला, १३ वर्षीय मुलगी, राजुर येथील ५५ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय पुरूष, अैरंगपुर येथील ४४ वर्षीय पुरूष, खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शाहूनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, राजुर येथील ५८ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरूष, अशी एकुण २३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या एक सहस्ञकाच्या पुढे म्हणजेच १०१३ झाली आहे.त्यापैकी ८४१ व्यक्ती बरे होऊन घरी गेलेली आहे.तर १५३ व्यक्ती उपचार घेत असुन आत्तापर्यंत १९ व्यक्ती कोरोनाने मयत झालेली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka 19 death corona