अकोले तालुक्यात आज १९ करोनाबाधित वाढ, माळीझापची संख्या वाढली
अकोले | Akole: तालुक्यात आज १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये माळीझाप येथील तब्बल आठ जण बाधित आढळून आले आहेत. माळीझाप येथे दोन तीन दिवसांपासून रुग्ण आढळून येत आहेत. आज आणखी भर पडली आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या २२४१ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात नवलेवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, अकोले यथील २७ वर्षीय महिला, ५२,५२ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय तरुण, कोतूळ येथील ३० वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, माळीझाप येथे ५५,३४,५५,३२ वर्षीय पुरुष, ४८,३२,२८वर्षीय महिला, ७ वर्षीय बालिका, धुमाळवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष, बेलापूर येथे ६५,२७ वर्षीय पुरुष असे आज १९ बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka 19 corona infected Malijhap increased