Akole: कोतुळच्या १२ सह तालुक्यात १८ व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सोमवारी प्राप्त अहवालात १८ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची बाधितांची संख्या ११४३ वर पोहोचली आहे. कोतुळमध्ये पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव.
तालुक्यात कोतुळ, ब्राम्हणवाडा व राजुर येथे घेण्यात आल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट तर खानापुर कोविड सेंटर येथे ६५ व्यक्तीचे स्वॅब घेऊन अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तर आज स्वॅब देण्यासाठी आलेली १० व्यक्ती स्वॅब न देताच पळून गेल्याची घटना घडली असुन नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. संपर्कातील लोकांनी घाबरून न जाता तपासणी करावी.
आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये कोतुळ येथील ५५ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महीला,३० वर्षीय महीला, २५ वर्षीय महीला, ४० वर्षीय महीला, ४९ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,१७ वर्षीय तरुण, २:५ वर्षीय मुलगा, ०२ वर्षीय मुलगा, मोग्रस येथील ३३ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथील ४४ वर्षीय महीला, ४० वर्षीय पुरूष, ०८ वर्षीय मुलगा, राजुर येथील ४५ वर्षीय पुरूष, २० वर्षीय महीला, अशी आज एकुण १८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या अकराव्या शतकाच्यापुढे म्हणजेच ११४३ झाली आहे.
पत्रकार: अलताफ शेख, अकोले
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka 18 corona infected Kotul 12