अकोले तालुक्यात तब्बल १७ कोरोना बाधित, एक मृत्यू
अकोले | Akole: शहरातील शेडफार्म, कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगर सह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतुळ येथील व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.
काल बुधवारी राञी खाजगी अहवलात शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत (शेडफार्म) मध्ये एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता तर शहरातील कारखाना रोड भागातील कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आलेल्या एक वृद्ध व्यक्तीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने सकाळी तालुक्यातील कोरोनाचा सातवा बळी गेला.
दुपारी तालुक्यातील खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये ७७ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील शेडफार्म ०१, शिवाजीनगर ०१, शेटे मळा ०१, धुमाळवाडी ०१, समशेरपुर ०४, हिवरगाव आंबरे ०६ व कोतुळ ०३ अशी १७ जणांचे अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत. शहरातील शेडफार्म येथील ६५ वर्षीय महीला, शिवाजीनगर ५० वर्षीय पुरुष, शेटेमळा २२ वर्षीय तरुण, धुमाळवाडी ३८ वर्षीय पुरुष, समशेरपुर येथील ४६ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुण, ४० व २० वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील ६५ वर्षीय, ४० वर्षीय, ३२ वर्षीय, ४० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय, ३२ वर्षीय महीला तर कोतुळ येथील ३६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय व २९ वर्षीय महिला अशी एकुण १७ व्यक्तीचे कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत.
तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या २४५ झाली आहे त्यापैकी १६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. ०७ मयत झालीय तर ७१ व्यक्तीवर उपचार सुरू आहे.
पत्रकार: अलताफ शेख (मोबा.७३८७०२०५९७)
Web Title: Akole taluka 17 coronavirus infected today
Get See: Latest Marathi News
संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.