Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज १६ करोनाबाधित वाढले

Akole: अकोले तालुक्यात आज १६ करोनाबाधित वाढले

Akole Taluka 16 corona positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १६ करोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिलासादायक म्हणजे शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. गणोरे, कोतूळ या गावांत वाढती रुग्ण संख्या. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२५१ इतकी झाली आहे. अॅटीजेन चाचणीत १५ बाधित तर खासगी अहवालात एक रुग्ण आढळून आला आहे.

आज प्राप्त झालेल्या खासगी अहवालात नवलेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. अॅटीजेन चाचणीत पिंपळगाव निपाणी येथील ४८,२१ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, गणोरे येथे ४५,३२ वर्षीय महिला, दीड वर्षाचा मुलगा,  पिंपळगाव नाकाविंदा ६० वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथील २० वर्षीय पुरुष, कातळापूर ६४ वर्षीय महिला, पांडोशी ३७ वर्षीय पुरुष, सावरगाव पाट ७० वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ६२ वर्षीय पुरुष, ५२,७० वर्षीय महिला असे १६ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 16 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here