Akole: बुधवारी अकोले तालुक्यात १६ व्यक्ती कोरोना बाधीत
अकोले | Akole: अकोले शहरात ०३, देवठाण ०५, नवलेवाडी ०२ सह तालुक्यात १६ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २९६७ इतकी झाली आहे.
तालुक्यात घेण्यात आलेल्या १६२ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १२ व्यक्तीचा ,खजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०४ व्यक्ती सह एकुण १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
राजुर ग्रामीण रुग्णालय येथून ४० कोतुळ ग्रामीण रुग्णलयातुन २८ अशी एकुण ६८ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
ॲन्टीजन टेस्टमध्ये नवलेवाडी येथील ५३ वर्षीय महीला, अकोले शहरातील १६ वर्षीय तरुण,( १:५)दिड वर्षीय मुलगी, ५८ वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, गणोरे येथील ४६ वर्षीय पुरूष, देवठाण येथील ३५ वर्षीय पुरूष,३० वर्षीय महीला,५३ वर्षीय महीला,११ वर्षीय मुलगी, ०९ वर्षीय मुलगा, साकुर( ता.संगमनेर) येथील ब्राम्हणवाडा सेंटरला तपासणी केलेला ४० वर्षीय पुरूष अशी १२ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात सुगाव बु येथील ८० वर्षीय पुरूष, खानापुर येथील ६६ वर्षीय महीला, राजुर येथील के.जी रोडवरील ६३ वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील २९ वर्षीय पुरूष अशी ०४ व्यक्तीसह आज १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
Web Title: Akole taluka 16 coorna infected Total 2967