Akole: अकोले तालुक्यात आज १४ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज बुधवार प्राप्त अहवालात १४ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अकोले तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ९७८ इतकी झाली आहे.राजूर येथे तीन, सावरगाव पाट चार, मन्ह्याळे दोन, पाडाळने येथे करोनाबाधित आढळून येत आहे.
आज प्राप्त अहवालात मन्ह्याळे येथील ३६ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगा, बेलापूर येथील ४५ वर्षीय महिला, राजूर येथील २४ वर्षीय महिला, ४१ व ७० वर्षीय पुरुष, पाडाळने १० वर्षाची मुलगी, ६० वर्षीय पुरुष, समशेरपूर ३४ वर्षीय पुरुष, सावरगाव पाट ८०, २९,२२ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, गणोरे येथील ५८ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे. तालुक्यात मयतांची संख्या १६ इतकी आहे.
अकोले तालुक्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील दुकाने बंद आहेत त्यामुळे शहरातील वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांच्या संख्येला आळा बसू शकतो.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka 14 corona infected today