Home अकोले अकोले: सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे येथे शिक्षक दिन साजरा.

अकोले: सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे येथे शिक्षक दिन साजरा.

सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे येथे शिक्षक दिन साजरा.

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी : -जीवनरूपी बाग फुलविण्यासाठी ज्ञानाचे सिंचन करावे लागते. हेच ज्ञान ग्रहण करण्यासाठी गरज असते गुरुंची आपल्या थोर भारतीय संस्कृतीत आचार्य देवो भव या उक्तीनुसार गुरूला देवाची उपमा दिली आहे. खरोखर आयुष्यभर देवाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना समान मानुन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचे भाग्य नशिबी आले. त्यास अतिशय व्रतस्थपणे, संवेदनशील मनाने सार्थ केले. समाजशील,राष्ट्रनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, जागरूक, संस्कारक्षम पिढी  घडविण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा हा सार्थ अभिमान उराशी बाळगुन सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता. अकोले ) येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठया आनंदमय वातावरण साजरा करण्यात आला.
यावेळी माध्यमिक विद्यालयातील ४०विद्यार्थी तसेच उच्च माध्यमिक विदयालयातील २०विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन विदयालयाचे कामकाज संभाळले. यावेळी माध्यमिक विदयालयातील अभिजीत पवार, रूपाली पराड तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील गौरी बेणके यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले.
याप्रसंगि माध्यमिक विद्यालयात जेष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णि तसेच उच्च माध्यमिक विद्यालयात प्रा. रामदास डगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत, दिपक पाचपुते, भरत भदाणे, कविता वाळुंज,प्रा.विक्रम आंबरे,प्रा.सौरभ बेणके,प्रा. सचिन लगड यांनी आपल्या मनोगतातुन डॉ. सर्वपल्लींच्या कार्याला उजाळा दिला.
तसेच सहभागी विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या महान कार्याचे वर्णन करून विदयार्थ्यांना जीवनातील महत्त्व पटवून सांगितले.
यावेळी नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, सुभाष बेणके,पि.के. बेणके आदी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माध्यमिक विद्यालयात प्रथमेश बेणके याने केले. तर पवन शिंदे याने आभार मानले. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विद्यालयात दिपिका बेणके हिने सुत्रसंचालन केले तर किरण बेणके याने उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक दिन यशस्वीतेसाठी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here