Home अकोले अकोले साडे बारा टन तांदूळाचा ट्रक पोलिसांनी पकडला

अकोले साडे बारा टन तांदूळाचा ट्रक पोलिसांनी पकडला

Akole Police seized a truck carrying rice

अकोले: रविवारी सायंकाळी तांदूळ भरलेला ट्रक पोलिसांनी कारवाई करत पकडला आहे. काळ्या बाजारातील रेशनचा तांदूळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रविवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ट्रकमध्ये गोण्यात भरलेला साडे बारा टन तांदूळ राजूर येथून संगमनेरला जाणारा ट्रक (एम,एच. १७.ए.जी. २४८३) मनोहरपूर फाटा येथे पकडला आणि अकोले पोलीस स्टेशनाला आणण्यात आला. ट्रक चालक शेहबाज मानियार याने सदर तांदूळ हा राजूर येथून आणल्याचे सांगितले आहे.

काळ्या बाजारातील रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना मिळाली होती. त्यांनी लगेचच कारवाई करत पथक पाठाविले.

उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी अकोले पोलीस स्टेशनला भेट देत चौकशी केली आहे. या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.   

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Akole Police seized a truck carrying rice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here