Home अकोले अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, रंगेहाथ पकडले

अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, रंगेहाथ पकडले

Akole police naik Pandey caught in the bribery department

अकोले | Bribery: अकोले तालुक्यातील अकोले पोलीस ठाण्याचे कार्यरत पोलीस कर्मचारी ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे. अकोले तालुक्यात गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

संदिप भाऊसाहेब पांडे (वय वर्ष,33) पोलीस नाईक ब.नं. 1681 नेमणूक – अकोले पोलीस स्टेशन, अहमदनगर. वर्ग – 3  असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे साडु व त्यांचे दोन मुलांचे विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपी विरुद्ध चॅप्टर केस लवकर करुन त्यांचालवकरात लवकर जामीन करुन देणेसाठी व त्यातील उर्वरित एक आरोपी चे विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक पांडे याने तक्रारदार यांचे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.  याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अहमदनगर विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आज दिनांक १८ रोजी केलेल्या पडताळणीत आरोपी पांडे पाच हजार रुपयांची लाच मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज लाचलुचपत विभागाने अकोले पोलीस स्टेशन येथे लाचेचा सापळा रचत कारवाई करण्यात आली. पोलीस नाईकनने पाच हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथील श्री सुनील कडासने व . पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथील श्री निलेश सोनवणे विजय जाधव वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दिपक करांडे, (पोलिस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर ) सुपरविजन अधिकारी हरिष खेडकर, (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर) यांनीं ही कारवाई केली आहे.

Web Title: Akole police naik Pandey caught in the bribery department

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here